एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही: पवारांचे स्पष्ट मत

एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही: पवारांचे स्पष्ट मत
शरद पवार

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांच्या (st strike)मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप (bjp)नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)हे चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे (st)विलीनीकरण शक्य नसल्याचे मत मांडले.

शरद पवार
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

राज्यात सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना शरद पवार (sharad pawar)यांनी एसटी संपाबाबत मार्ग निघाला पाहिजे असं म्हटलं आहे. ते म्हणाले, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सेवेत घेणे सोपे नाही. राज्यात खूप महामंडळे आहेत. त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. एकाला सेवेत घेऊन दुसऱ्याला दुखावणे योग्य नाही.

राज्यातील हिंसाचारावर भाजपवर टीका

शरद पवार यांनी राज्यातील हिंसाचारावरुन भाजपवर टीका केली आहे. त्रिपुरातील घटनेचे पडसादर अमरावतीत का उमटले असा सवाल करत भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com