Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशउमा भारतींचा घणाघात; शरद पवार रामद्राेही

उमा भारतींचा घणाघात; शरद पवार रामद्राेही

राम मंदिर – दिग्विजय सिंह यांनी केली ‘ही’ मागणी

भोपाळ – Bhopal

- Advertisement -

शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिराबाबत केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात नाही तर प्रभू रामचंद्रांच्या विरोधात आहे, अशी घणाघाती टीका उमा भारती यांनी केली आहे.

उमा भारती शदर पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘शरद पवार यांचे विधान हे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या विरोधातील नाही तर भगवान श्रीराम यांच्याविरोधातील आहे. ते ‘रामद्राेही’ पंतप्रधान दोन तासांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत गेले तर अर्थव्यवस्थेवर कुठले संकट येणार आहे. माेदी विमानातूनसुद्धा काम करतात. चार तासांपेक्षा जास्त झाेपत नाही. आयाेध्येत जातांना ते फाइल वर्क करत जातील आणि फाइल वर्क करत येतील. त्यामुळे शरद पवार यांचे हे विधान राम द्रोही आहे.’

काय म्हणाले हाेते पवार

साेलापुरात राम मंदिराच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले हाेते, ‘काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे करोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे.

शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

राम मंदिर भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली हाेती. त्यासंदर्भात शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान करोनाशी लढताना झालेले आहे. कोरोनाची लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने. धर्मावर व देवावर श्रद्धा कायम असते.

राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने केला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयाेध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. त्यावर बाेलताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही अयाेध्येत गेले, नसतानाही गेले, शिवसेना आणि अयोध्येचे नाते आहे. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही. राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केले. यामुळे उद्धव ठाकरे यांना आमंत्रणाची गरज नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या