पवार म्हणाले, उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर...

सीरममधील आगीवर केले भाष्य
पवार म्हणाले, उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर...

कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान पवार यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केले. देशात सुरु असणाऱे शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. जयंत पाटील यांच्या विषयावर ते पवार म्हणाले, 'उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर? मला कधी वाटत नाही म्हणून कुणी करत नाही' असा मिश्किल सवाल उपस्थितीत करून जयंत पाटलांच्या विधानातून हवा काढून टाकली.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे", असे ते म्हणाले होते.

सीरममधील आग अपघात

शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. पत्रकारांशी बोलत असता सीरम संस्थेत आग लागली या मागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की,'आज आपण असे बोलणे योग्य नाही. सीरम संस्था आणि तिथे काम करणाऱ्या सर्व संशोधकांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ही घटना पूर्णपणे अपघात आहे', असं पवार यांनी ठामपणे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com