Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांना कोरोनाची लागण ( Covid positive)झाली आहे. स्वत: शरद पवार Covid positiveयांनी ट्विट करत ही माहिती दिली. प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. शरद पवार यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली तरी काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी.

- Advertisement -

मालेगावच्या युवकाच्या उद्योगात ‘लेन्सकार्ट’चे सीईओ झाले भागिदार

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

काय आहे धुळीचे वादळ? कसे निर्माण होतात धुळ कण

- Advertisment -

ताज्या बातम्या