Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनवीन कृषी कायद्यांना पवारांचे समर्थन, म्हणाले...

नवीन कृषी कायद्यांना पवारांचे समर्थन, म्हणाले…

मुंबई

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) झाल्यानंतर राजकीय चर्चा सुरु झाली होती. या बैठकीत कशावर चर्चा झाली याचा खुलासा स्वतः शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

कृषी कायद्याबाबत पवार म्हणाले की, कृषी कायदे पूर्णपणे नाकारता येत नाहीत. पण ज्या भागांमुळे शेतकऱ्यांना अडचणी आहेत, कायद्याच्या त्या भागामध्ये सुधारणा केली जाणे आवश्यक आहे.

मुंबईतील खासगी विद्यापीठाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले शरद पवार यांना महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ठराव आणणार का, असा सवाल माध्यमांना केला. त्यास उत्तर देताना ते म्हणाले की, ‘संपूर्ण विधेयक नाकारण्याऐवजी ज्या भागाविषयी शेतकऱ्यांना आक्षेप आहे त्या भागामध्ये आपण बदल करू शकतो. हा कायदा अंमलात आणण्यापूर्वी राज्यांनी त्याच्या वादग्रस्त बाबींचा विचार केला पाहिजे.’

काय म्हणाले पवार

शेतीचं अर्थकारण सुधारणा करण्याशिवाय गत्यंतर नाही.

शेती सुधारली तर अर्थकारण बदलेल.

कृषी क्षेत्रात संशोधनाची गरज आहे.

अन्नधान्य आयातापासून तांदूळ, साखरेचा सर्वात मोठा निर्यातदार देश अशी भारताने प्रगती केली.

महाराष्ट्रात खासगी कृषी विद्यापीठ उभी राहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या