राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार म्हणाले...

शरद पवार
शरद पवार

नाशिक | Nashik

राज्य लोकसेवा आयोगाच्या (State Public Service Commission) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धतीच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून पुण्यात आंदोलन छेडले होते. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते.

या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील राजकारणही ढवळून निघाले होते. त्यामुळे पुण्यातील या आंदोलनाची दखल घेत राजकीय नेत्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या आंदोलनकर्त्या उमेदवारांची भेट घेत त्यांना दिलासा दिला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत आयोगाबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचाही त्यांनी शब्द दिला होता.

शरद पवार
मला पोलिसांनी...; महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरून सुप्रिया सुळे भडकल्या

दरम्यान, आज आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता शरद पवार यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, "तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या (MPSC) परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा." असे ट्विट करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्याया ट्विटनंतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही त्यांचे आभार मानले आहेत.

शरद पवार
MPSC उमेदवारांना मोठा दिलासा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com