शेतकऱ्यांसाठी काय केलं? PM मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

शेतकऱ्यांसाठी काय केलं? PM मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई | Mumbai

पंतप्रधान मोदींनी (PM Modi) शिर्डी दौऱ्यावेळी भर सभेत बोलत असताना शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवारांनी कृषीमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. त्यावर आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान हे पद संस्थात्मक, त्याची प्रतिमा राखायला हवी, पदाची प्रतिमा राखून त्यांनी जी माहिती दिली, ती वस्तुस्थितीपासून फारच दूर आहे, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर कृषिखात्याताली माझ्या सहभागाबद्दल काही मुद्दे मांडले. पण, पंतप्रधान हे एक संविधानिक पद आहे. संविधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, हे मला समजतं. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. मोदींनी सांगितलेली माहिती वास्तवापासून दूर आहे. २००४ ते २०१४ या काळा देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर मी कटू निर्णय घेतला तो म्हणजे अमेरीकेतीला गव्हाचा आयात करणे. कारण देशात पुरवठा नव्हता. मी दोन ते तीन दिवस फाईलवर सही केली नाही. कारण भारत कृषीप्रधान देश असताना बाहेर देशातून धान्य आणावे हे मला मान्य नव्हते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांनी मला विचारण्यात आला देशातील साठ्याची माहिती तुम्हाला आहे का? ते म्हणाले फाईलवर सही केली नाही तर आपल्याला देशात धान्यपुरवठा करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे धान्य आयात केले, याचा फायदा देशाला झाला, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, २००४ मध्ये तांदूळ, गहू, कापूस, ऊस, सोयाबीन ह्या सगळ्या पिकाच्या हमीभावात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केली. महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाचा कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा यामुळे बदलला गेला. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना घेतलेले निर्णय वाचून दाखवले.

२००४ ते २०१४ मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम घेतले. २००५ ला नँशनल हॉर्टिकल्चर मिशन हाती घेतलं. गहू आणि भाताच्या उत्पन्नात‌ माझ्या काळात‌ मोठी वाढ झाली. पीककर्जाचा दर ११ टक्के होता तो ४ टक्क्यांवर आणला. काही बँका ३ लाखांपर्यंत ० टक्क्यांनं कर्ज देत होत्या, असे शरद पवार यांनी सांगितले. २०१५ मध्ये नरेंद्र मोदी यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. तसेच २०१२ मध्ये जागतिक अन्नसंघटनेनं मान्य केलं की तांदळाचं विक्रमी उत्पादन झाले. पंतप्रधान हे संविधानिक पद आहे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र त्यांचे वक्तव्य वास्तवावर आधारित नव्हते. त्यांना वास्तवाचं भान दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com