Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; केली 'ही' मागणी

शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय पशुसंवर्धन, डेअरी आणि मत्स्य विभागाचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupala) यांना दुग्ध उत्पादनांच्या आयातीसंदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दूध उत्पादकांना (Milk Producers) फटका बसेल असा निर्णय घेऊ नये. तसेच त्याबाबत विचार करावा अशी मागणी केली आहे…

- Advertisement -

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

शरद पवारांनी पत्रात म्हटले की, दूध उत्पादक शेतकरी सध्या करोना (Corona) संसर्गाने निर्माण झालेल्या संकटातून सावरत आहे. केंद्र सरकारचा अशा प्रकारचा निर्णय दूध व्यवसाय पुन्हा उभारी घेत असताना झाल्यास त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशात केंद्र सरकारने जर लोणी आणि तूप यांसारखे पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला तर या सगळ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे मी जी चिंता व्यक्त करतो आहे ती गांभीर्याने घ्या आणि कृपा करून हा निर्णय मागे घ्या असे त्यांनी पत्रात म्हटले.

Padma Shri Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

दरम्यान, गेल्या १५ महिन्यांत दुधाच्या दरात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात दूध उत्पादनात कोणतीही वाढ (Growth) झालेली नाही. तसेच सरकारी आकडेवारीनुसार २०२१-२२ या वर्षात देशातील दूध उत्पादन ६.२५ टक्क्यांनी वाढून २२१ दशलक्ष टन झाले आहे. तर भारताने शेवटची डेअरी उत्पादने सन २०११ मध्ये आयात केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या