शरद पवार यांची प्रकृती बिघडली : ब्रीच कँडीत दाखल

आजच शस्त्रक्रिया होणार?
 शरद पवार
शरद पवार

मुंबई:

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु त्यांना वेदना होऊ लागल्यामुळे आजच दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टि्वट करुन दिली.

शरद पवार यांच्यांवर बुधवारी एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यांचा पोटदुखीचा त्रास बळावल्याने आजच त्यांना ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले असून आजच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे झाले आहेत. आज त्यांच्या पोटात दुखू लागले. यामुळे बुधवार ऐवजी मंगळवारीत पवार रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. त्यांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दुपारी पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com