Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांनी दिला शेतकर्‍यांना 'हा' सल्ला

शरद पवारांनी दिला शेतकर्‍यांना ‘हा’ सल्ला

इंदापूर । वृत्तसंस्था | Indapur

तुमचे उत्पन्न (income) सार्वजनिकरित्या सांगू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President MP Sharad Pawar) यांनी शेतकर्‍यांना (farmers) दिला.

- Advertisement -

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार (sharad pawar) शेतकर्‍यांच्या भेटीगाठींसाठी दौर्‍यावर निघाले. त्यांनी द्राक्ष बागायतदार आणि ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकर्‍यांच्या (farmers) शेतावर जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. पवार यांनी इंदापूर तालुक्यातील कळस मधुकर खर्चे यांच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली.

मधुकर खर्चे यांनी एका एकरात 100 टनापेक्षा अधिक उत्पन्न घेतलं आहे. गेली अनेक वर्ष खर्चे 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. उसाच्या शेताला भेट दिल्यानंतर शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मसाखर उत्पादनात भारत एक नंबरचा देश आहे. ब्राझीलमधल्या (Brazil) लहान शेतकर्‍यांचा उस 50 हजार टन असतो. ब्राझीलमध्ये 6-7 उस उत्पादक शेतकरी कारखाना चालवतात. आपल्याकडे काही हजारात सभासद असतात. याआधी एकरी 100 टन पेक्षा जास्त उस आणि 50 कांडी उस मी बघितला आहे. हे करण्याचा उद्योग खर्चे यांनी केला आहे,फ असं शरद पवार म्हणाले.

ममाझ्यासमोर पत्रकार बसले आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्ही सांगितलं की किती उत्पन्न मिळालं. असं सार्वजनिकरित्या सांगू नका. नाहीतर हे लोक दाखवतील शेतकर्‍यांना एवढे पैसे मिळतात, मग दिल्लीतल लोक शेतकर्‍यांना कर लावतील,फ असं म्हणत शरद पवारांनी शेतकर्‍यांना सावध केलं.

शरद पवार द्राक्षाच्या मळ्यात

शरद पवार यांनी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याच्या मळ्यांनाही भेट दिली. इंदापूर तालुक्यातील बोरी आणि कळस या गावांना पवार यांनी भेटी दिल्या. ममी एका ठिकाणी विचारले की खासदार येतात का? तर ते म्हणाले सारखे येतात. आधीचे खासदार कधी येतंच नव्हते तेव्हा मी सांगितले की पूर्वीचा खासदार मीच होतोफ असे म्हणताच एकच हशा पिकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या