देशमुखांना कारागृहात टाकल्याची किंमत भाजपला मोजावी लागेल: पवारांचा इशारा

देशमुखांना कारागृहात टाकल्याची किंमत भाजपला मोजावी लागेल: पवारांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh)यांना कारागृहात टाकल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar)यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा (Attack on BJP)दिला.

देशमुखांना कारागृहात टाकल्याची किंमत भाजपला मोजावी लागेल: पवारांचा इशारा
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार (Sharad Pawar)यांनी म्हटलं, 'अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे'. तसंच, अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल. त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

देशमुखांना कारागृहात टाकल्याची किंमत भाजपला मोजावी लागेल: पवारांचा इशारा
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की मी नागपूरला आलो व अनिल देशमुख माझ्या सोबत नाही. अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहीत आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळलं. मात्र काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुउपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायची असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नसले त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपवर घणाघात केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com