"मी गेलो नाही याचं मला..."; शरद पवारांची संसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर टीका

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

राजधानी दिल्लीसह देशभरात आज नव्या संसद भवनाच्या (Sansad Bhavan Inaugaration) उद्घाटन सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे.या सोहळ्यादरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची (Sengol) पूजा केली. मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनाही करण्यात आल्या...

त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्षेप घेतला आहे. संसदेत धर्मकांड सुरू होतं. त्यामुळे आधुनिक भारताची नेहरूंची संकल्पना मागे पडली की काय? याची चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी (Jawaharlal Nehru) विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार
“संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा...”; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

ते पुढे म्हणाले की, ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष मागे नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे, असे शरद पवारांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे, असा आक्षेप शरद पवार यांनी नोंदवला. तसेच “राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणं ही त्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत, त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. असेही शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनात राजदंड स्थापित

ते पुढे म्हणाले की, राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभेचे अध्यक्ष दिसले याचा आनंद आहे. पण राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती आहेत. पण त्यांची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता का? असा प्रश्न आहे”, असे त्यांनी सांगितले.

तसेच ''जुन्या संसदेशी आमची बांधिलकी आहे. ही बांधिलकी मी खासदार आहे म्हणून नाही. देशात दिल्लीत कुणीही आल्यानंतर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट या गोष्टी बघण्याचं औत्सुक्य असतं. आता ते सगळं त्याचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. का आहे कुणास ठाऊक. पण ठीक आहे, आता निर्णय घेतला, राबवलाय”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com