शरद पवार यांच्या करोनासंदर्भात मंत्री टोपे यांनी दिली ‘ही’ माहिती

सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या आणखी सहा कर्मचाऱ्यांना करोना
शरद पवार
शरद पवार
शरद पवार
संगमनेरात नव्याने 30 करोना बाधित

मुंबई: Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सुरक्षेसाठी तैनात सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या आणखी सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सिल्व्हर ओकवरील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या १२ इतकी झाली आहे. शरद पवार यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ( Sharad Pawar Covid 19 tests negative ) सुरक्षारक्षक कायम लोकांना शरद पवारांपासून दूर करत असतात. त्यामुळे त्यांना करोनाची लागण झाली असावी, असे राजेश टोपे म्हणालेत.

काल शरद पवारांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अँटीजेन चाचणी आणि सर्व चाचण्या करण्यात आल्यात. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. शरद पवार यांच्या घरातील ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांचे हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com