Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या...अन् शरद पवार भर पावसात पोहचले कार्यकर्त्याच्या लग्नाला

…अन् शरद पवार भर पावसात पोहचले कार्यकर्त्याच्या लग्नाला

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे संपूर्ण राज्यासह देशाच्या चर्चेच्या विषय ठरलेले आहेत. ज्यामुळे राज्याचे राजकारण हे फक्त आणि फक्त शरद पवार यांच्याच आजूबाजूला फिरत असल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर जरी आता पडदा पडलेला असला तरी शरद पवार यांची चर्चा होणे कमी होत नसल्याचे दिसून येत आहे…

- Advertisement -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान (Assembly Elections) साताऱ्यात (Satara) श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भाषण देत असतांना अचानक पावसाने (Rain) हजेरी लावली होती. तेव्हा शरद पवारांनी पावसाचा विचार न करता पावसात भाषण केले होते. त्यावेळी राज्यात या सभेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. यासभेनंतर शरद पवारांचे सभेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले होते.

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार हे सोलापूरमध्ये (Solapur) पावसात भिजल्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. मात्र, यावेळी कोणतीही सभा किंवा कोणताही मेळावाही नव्हता. ते याठिकाणी सोलापूरचे माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यासाठी आले होते.

नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शरद पवार हे काल (रविवार) पंढरपूर सांगोला दौऱ्यावर होते. त्यानंतर पवार दौरा आटोपून सोलापुरात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. कार्यकर्ते शरद पवार यांच्यासाठी पावसात उभे असल्याचे पाहताच त्यांनी आपले वाहन थांबवून पावसात भिजत कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. सोलापूरमधल्या शरदचंद्र पवार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात सपाटे परिवाराचा विवाह संपन्न झाला. यावेळी शरद पवार विवाहस्थळी येताच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या