
धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी)
कितीही खोटे गुन्हे दाखल (Filing false cases)केले तरी मी घाबरणारा (Not scary.) नाही. उलट मी पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा (Guardian Minister Gulabrao Patil) आभारी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो, अशा शब्दात युवा सेनेचे महाराष्ट्र प्रचारक शरद कोळी (Yuva Sena's Maharashtra campaigner Sharad Koli) यांनी ना. पाटील यांच्यावर टीका केली आहे. तसेच आपण भविष्यात धरणगावसह जळगाव ग्रामीण (Jalgaon rural including Dharangaon) मधील दादागिरी मोडून काढणार (Bullying will be broken) असून, येथूनच उमेदवारी करु असा इशारा देखील त्यांनी दिला.
तत्पूर्वी शरद कोळी यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कायदेशीर बाबी लक्षात घेऊन जामीन अर्जावर चर्चा केली. यानंतर त्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकास माल्यार्पण केले. कार्यक्रम चे प्रास्ताविकात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी २६/११च्या शहीदांना आदरांजली अर्पण केली व संविधान दिनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी ईडी सरकार असंविधानिक असून गुपनियतेची शपथ घेऊन सुध्दा खोटे गुन्हे दाखल होत आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी शहीद जवान याना 2 मिनिटे स्तब्ध्द उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जानकीराम पाटील दिपक सोणवने जितू धनगर सुरेश बुटु महाजन राजेद्र ठाकरे रमेश पाटील नंदु पाटील भागवत चौधरी धिरेद्र पुरभे किरण पाटील योगेश वाघ राहुल रोकडे गजानन बयस गणेश महाजन विनोद रोकड़े किरण अग्निहोत्री भरत महाजन परमेश्वर महाजन विजय महाजन रवि जाधव तुषार न्हाळदे जितु बयस विलास पवार जयेश महाजन गोपाल महाजन सुनिल चव्हाण उमेश महाजन संतोष महाजन पप्पू कंखरे स्वप्निल परदेशी नाना ठाकरे यांचा सह अंसख्य कार्यक्रते उपस्थित होते. कर्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद रोकडे यांनी केले.