“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही...”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज

“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही...”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज

दिल्ली | Delhi

मागील काही दिवसांपासून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र महाराज (Bageshwar Dham Mahant Dhirendra Shastri) हे देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा हे महाराज करतात. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही त्यांचा दिव्य दरबारवर आयोजित करण्यात आला होता.

मात्र, त्यांच्या दरबारावर अनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी टीका केली होती. तसेच महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध केली, तर ३० लाख रुपयांचं बक्षिस देईन, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले होते. दरम्यान, आता ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना आव्हान दिलंय.

जोशीमठचं भूस्खलन (Joshimath Sinking) थांबवून दाखवा, मग चमत्कार खरे मानू असं ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी आव्हान दिलंय. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती दाखल झालेत. चमत्कार दाखवणाऱ्यांनी आधी जोशीमठला यावं आणि भूस्खलन थांबवून दाखवावं, तसं केल्यास मग आम्ही त्यांचा जयजयकार करु, त्यांना वंदन करु असं शंकराचार्यांनी म्हटलंय.

“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही...”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

चमत्कार करत असाल तर धर्मांतरण थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, शांतता प्रस्थापित करा, तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरा तर नमस्कार करू, नाहीतर तुम्ही कपट करत आहात असं मानू असं शंकराचार्यांनी सुनावलंय. यावेळी शंकराचार्यांनीही हात चलाकी करणाऱ्यांवरही निशाणा साधला.

दरम्यान धीरेंद्र महाराज-अंनिस यांच्या वादात भाजपा (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी देखील उडी घेतली आहे. स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे अनेकदा विज्ञानावरही विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे. आमच्या साधु-संतांवर टीका केल्यानंतर ते लगेच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेस सहभागी होतात. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन फिरताना दिसतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलनकार जी टीका करत होते, ती राहुल गांधींची स्क्रिप्ट होती का? हे सर्व काँग्रेसने ठरवून केलं होतं का? कारण काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नाही, अशी टीका राम कदम यांनी केली.

“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही...”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज
धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

कोण आहेत धीरेंद्र शास्त्री? (Who is Dhirendra Shastri of Bageshwar Dham)

धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम मंदिराशी जोडलेले आहेत. त्यांचे देशभरात हजारो भक्त आहेत. छत्तरपूरमधील गाडा गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते. असं सांगितलं जातं की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा निर्मोही आखाडाशी जोडलेले होते.

“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही...”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज
अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्..., पुढं जे घडलं ते थक्क करणारं

धीरेंद्र शास्त्री लहानपणापासूनच चंचल, हुशार आणि जिद्दी होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. त्यांनी गावाजवळील गंज गावातून हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आहे. धीरेंद्र गर्ग यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला असून त्यांचे वडील गावात पुजारी म्हणून काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. एक वेळ अशी आली की त्याच्या कुटुंबातील काका वगैरेंनी गावात राहणाऱ्या कुटुंबांना पुजारीपदासाठी आपसात वाटून घेतले.

वाटणीनंतर महाराजांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यांची आई सरोज यांनी म्हशीचे दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. इकडे बागेश्वर धामचे महाराज काहीतरी करण्याच्या तयारीत होते. गावातील लोकांमध्ये बसून त्यांनी कथा कथन सुरू केले आणि हळूहळू कथांमध्ये ते इतके प्रवणी झाले की २००९ मध्ये त्यांनी पहिली भागवत कथा जवळच्या पहारा येथील खुदान गावात सांगितली. हे करत असताना त्यांची आजूबाजूला ओळख झाली आणि लोक त्यांच्या गावातील भागवत कथा कार्यक्रमात त्यांना ऐकू लागले.

“जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही...”; शंकराचार्यांचं धीरेंद्र शास्त्रींना थेट चॅलेंज
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com