शालिमार एक्सप्रेसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

शालिमार एक्सप्रेसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

नाशिकरोड | दिगंबर शहाणे |Nashik Road

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashik Road Railway Station) नाशिकहून मुंबईकडे ( Nashik to Mumbai) जाणाऱ्या शालीमार (Shalimar Express) एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या आगीमुळे लाखो रुपयांचे मालवाहू साहित्य भस्मसात झाले असून प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर ही आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या आगीमुळे रेल्वेची (Railway)वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान, शालीमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आल्यावर वायरमन व मोटरमन यांच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com