Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनNCB चा कोर्टात दावा : आर्यनच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, आरोपींची कोठडीही वाढली

NCB चा कोर्टात दावा : आर्यनच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, आरोपींची कोठडीही वाढली

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील (cordelia cruise) हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर (drug party) NCB ने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी अटकेत असलेले आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांची कोठडी आज संपली. त्यानंतर NCBने न्यायालयात आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तवाद ऐकल्यानंतर आर्यनखानसह इतर आरोपींना तीन दिवासांची कोठडी दिली. यामुळे ७ ऑक्टोंबरपर्यंत आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

आर्यन खानची कोठडी मागताना एनसीबीने असं म्हटलं आहे की, आर्यनच्या फोनमध्ये काही फोटो सापडले आहेत जे आक्षेपार्ह आणि धक्कादायक आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी.

दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, आर्यनच्या फोनमधून असा काही लिंक मिळाल्या आहेत की, जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीकडे इशारा करत आहे. आज आम्ही आणखी एका व्यक्तीस अटक केली आहे. त्यांचा एक ग्रुप आहे. हा ग्रुप एखाद्या अटल टोळीसारखे काम करत आहे. जोपर्यंत आम्ही ग्राहकांची चौकशी करणार नाही? तोपर्यंत पुरवठादार व त्याची साखळीसंदर्भात आम्हाला काहीच माहिती मिळणार आहे.

दरम्यान वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आर्यनजवळ कोणतेही मादक पदार्थ मिळाले नाही. अरबाज मर्चंटजवळ केवळ ६ ग्रॅम ड्रग्ज मिळाले. आर्यनने कधी ड्रग्जचे सेवन केले नाही.

5 लाखापर्यंतची एन्ट्री फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 80 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त

या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कर्मयात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पँट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या