शिवसेना आमदारालाच अश्लील व्हिडीओत अडकवण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदारालाच अश्लील व्हिडीओत अडकवण्याचा प्रयत्न
Crime

मुंबई

मुंबईतील शिवसेना आमदाराला (Shivsena MLA) सेक्स टॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Crime
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

मौसमदीन मेव राजस्थानमधून (Rajsthan) अटक करण्यात आले आहे. त्याने युवती असल्याचे भासवत त्यांच्याशी चॅट सुरु केले. चॅटद्वारे त्याने आमदारांंकडे मदत मागितली. आमदारानेही त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर थोड्याच वेळाने आमदाराच्या मोबाइलवर एका महिलेचा व्हीडिओ कॉल आला.

या महिलेने आमदारशी 15 सेकंद बातचीत केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान, हा कॉल कट झाल्यानंतर काही वेळाने आमदाराच्या मोबाइलवर याच नंबरवरुन एक व्हीडिओ पाठविण्यात आला. जो एडिट करण्यात आला होता. हा व्हीडिओ पाठवून आरोपीने आमदाराकडे तात्काळ 5 हजार रुपयांची मागणी केली. आमदाराने देखील फोन-पे वरुन आरोपीला 5 हजार रुपये दिले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी एका वेगळ्याच नंबरवरुन आमदाराला फोन आला. त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा अश्लील व्हीडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करत 11 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मात्र आमदाराने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com