Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, नाशिकमध्ये अलर्ट

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, नाशिकमध्ये अलर्ट

मुंबई

राज्यातील बहुतांशी भागात रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. मुंबईत पावसाचे तांडव सुरु आहे. आता राज्यात १९ ते २३ जुलै रोजी हवामान विभागाने महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच १९ रोजी नाशिकमध्ये अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

पुढील महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार कारण…

संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरं आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून, सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.

- Advertisment -

ताज्या बातम्या