Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशहरात सत्तर टक्के बेड रिक्त

शहरात सत्तर टक्के बेड रिक्त

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात दुसर्‍या लाटेतील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण झपाट्याने घटत असून रूग्ण संख्याही कमी झाली आहे. परिणामी शहरातील शासकीय सह सर्वच रूग्णालयांतील सुमारे 70.28 टक्के बेड रिक्त झाले आहेत.

- Advertisement -

शहरात 188 हॉस्पीटलमध्ये 8 हजार 214 बेड आहेत यामध्ये साधारण बेड 3 हजार 132, ऑक्सीजन बेड 3 हजार 726, आयसीयु बेड 1078 तर व्हेंटीलेटर बेड 839 इतके आहेत. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी व मे महिन्याच्या प्रारंभी साधारण बेड मिळत नव्हते तर ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेड खुप दुरापास्त झाले होते. तर कारोना रूग्णांना उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ तसेच जिल्हा यंत्रणेने विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यावर भर देण्यात आला होता.

शहरातील ठक्कर डोम तसेच पंचवटीतील मिनाताई ठाकरे स्टेडियम येथे तसेच नवीन नाशिक येथे कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. तरीही बेड अभावी अनेक रूग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संख्येत घट येण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात 24 तासात सरासरी 7 ते 8 हजार रूग्ण संख्या आता सरासरी 700 वर आली आहे. हा रूग्ण बरे होण्याचा दर 95.05 टक्क्यांवर पोहचला आहे.

सध्या जिल्ह्यात 14 हजार रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 5 हजार 619 रूग्ण महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये, गृह विलीगीकरणात तसेच विविध ठिकाणच्या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा रूग्णालय 97, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 97 रूग्ण उपचार घेत आहेत. तर 2 हजार 532 रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

नाशिक महानगर पालिका हद्दीत आतापर्यंत 2 लाख 21 हजार 789 रूग्ण कारोना पॉझिटिव्ह झाले होते. यापैकी 2 लाख 14 हजार 49 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1 हजार 927 रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. परंतु सध्या कारोना व रूग्ण संख्या घटन्याच्या परिणामी रूग्णालयांमधील बेडही रिक्त झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या