Video : मोदी सरकारला सात वर्ष पुर्ण : काँग्रेसचे नाशिकमध्ये आंदोलन

Video : मोदी सरकारला सात वर्ष पुर्ण : काँग्रेसचे नाशिकमध्ये आंदोलन

थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

नाशिक | Nashik

मोदी सरकारला आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. एकूण मोदी सरकारच्या कार्यकाळास सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याचाच निषेध म्हणून काँग्रेस (Congress) आज मोदी सरकारविरोधात नाशिकमध्ये एल्गार पुकारला. इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी या मुद्यांवरुन काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

करोना संकटाबाबत मोदी सरकार गंभीर दिसत नसून त्यांचं वागणं हे बेफिकिरीचे आहे. कोरोनाचं संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. देशात करोनाचा जो उद्रेक झाला त्यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे.

गंगेच्या पात्रत अनेकांचे शवं वाहत होते. हे पाप मोदी सरकारचे असल्याचा घणाघात काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात काॅग्रेसकडून रविवारी (दि.३०) आंदोलन करण्यात आले. थोरात यांनी एमजीरोड येथील शहर काॅग्रेस कमिटि कार्यालयात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती.

१५ लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा परत आणू, महगाई कमी करु असे सांगितले.पण आता पेट्रोल शंभर पार झाले. एलपीजी नऊशेवर गेला. खाद्यतेल दोनशे रुपये लिटरवर गेले.कामगार कायद्यामध्ये बदल करताना कामगारांऐवजी मालकांना विचारात घेतले गेले. दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. कोरोना संकट येणार काळजी घ्या हे राहुल गांधी यांनी आधीच सांगितले. पण त्यांचे ऐकले नाही आणि कोरोना वाढला. थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा उपाय नव्हता.

निवडणुकीचे मेळावे, धार्मिक मेळावे यामुळे कोरोना वाढला, अशी गंभीर आरोप थोरात यांनी केले. करोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार असून लस नसताना कोणत्या आधारावर मोहत्सव जाहीर केला, असा जाब त्यांनी विचारला. लसीकरणासाठी अॅप तयार केले गेले. तरी देखील सावळा गोंधळ सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी दुसऱ्या देशाला लस दिली, अशी सडकून टीका थोरात यांनी केली.

भाजप महाराष्ट्र द्रोही पक्ष

तौत्ते चक्रीवादळ नूकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी गेले. तिकडे हेलिकॉप्टर फिरले. भाजपवाल्यानी विचारायला हवं मोदी गुजरातला जाता महाराष्ट्रात का नाही ?

महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचा महाराष्ट्र द्रोह उघड दिसतो अशी टिका थोरात यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली.

Related Stories

No stories found.