एमपीएससी परीक्षेसाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांची दांडी; ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. यावेळी तब्बल साडेसात हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली…. (MPSC Examination)

या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

या परीक्षेत 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. जिल्ह्यातील 58 परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *