बाजारपेठेला जोडणारे सात रस्ते बंद

अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
बाजारपेठेला जोडणारे सात रस्ते बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिवाळीनिमित्त ( Diwali Festival -2022 ) खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने नाशकातील सात मार्गांवर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील गल्लीबोळातून दुचाकी, तीन चाकी वाहन चालकांनी आपली वाहने बंदी असलेल्या रस्त्यांवर टाकल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी शहरातील बाजारपेठेच्या परिसरामध्ये तोबा गर्दी केली होती. या परिसरामध्ये 15 ते 27 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत रस्ता वाहनांसाठी बंद असल्याची अधिसुचना जारी केली होती. यामध्ये मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेन रोड, शालीमार परिसर याठिकाणी काही महत्वाचे मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. तसे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिवाळीच्या खरेदी निमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी बघता हे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

पोलिस वाहतूक उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी काढलेल्या आदेशानुसार, शहरातील एकूण 7 मार्गांवर वाहन बंदी असेल. सकाळी 8 ते रात्री 11 या वेळात ती लागू असेल. मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेन रोड, शालिमार याठिकाणचे काही मार्ग वाहनांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे अन्य रस्त्यांचा वापर

वाहन धारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. त्यामध्ये मालेगाव स्टॅन्ड, मखमलबाद नाका, रामवाडी, चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे इतरत्र जातील. जुने नाशिककडे ये-जा करण्यासाठी गंजमाळ सिग्नल, दूध बाजार या मार्गाचा वापर करता येईल. तर गोदा घाट, गाडगे महाराज पुलाखाली, सांगली बँक सिग्नल, नेहरू उद्यान, कालिदास कला मंदिर समोरील पे अँड पार्क येथे वाहन पार्क करता येईल.

हे मार्ग वाहनांना बंद

मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजाकडे येणारी अवजड वाहने दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंटकडे येणारी वाहने रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा नेपाळी कॉर्नर ते मेन रोड मार्गे धुमाळ पॉईंट सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट मेन रोड कडे जाणारी वाहने, रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट

पर्यायी मार्ग

मालेगाव स्टॅन्ड, मखमलबाद नाका, रामवाडी,

चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे जुने नाशिककडे ये-जा करण्यासाठी गंजमाळ सिग्नल, दूध बाजार

पार्किंग सुविधा

गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली, सांगली बँक सिग्नल, नेहरू उद्यान, कालिदास कला मंदिर समोरील पे अँड पार्क

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com