
बिहार | Bihar
येथील रोहतास जिल्ह्यातील (Rohtas District) शिवसागर परिसरात (Shivsagar Area) स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू (Death) झाला असून ५ जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर स्कॉर्पिओने रोहतास जिल्ह्यातील एका राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (Container) धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या गाडीमधून एकूण १२ जण प्रवास (Travel) करत होते. त्यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व लोक कैमूरचे रहिवासी होते, ते बौद्धगयाहून आपल्या गावी परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान, चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण ( Vehicle Control) सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये पाच महिला आणि दोन मुलांचा समावेश असून हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. तसेच मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.