Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाच्या नव्या अवताराचे पुण्यात सात रुग्ण

करोनाच्या नव्या अवताराचे पुण्यात सात रुग्ण

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोनापासून( Corona ) काही प्रमाणात दिलासा मिळत असतानाच हळहळू राज्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शनिवारी पुण्यात नवीन व्हेरिएंटचे सात रुग्ण सापडल्याने या चिंतेत भरच पडली आहे.

- Advertisement -

राज्यात बीए. 4 व्हेरिएंटचे (BA. 4 ) चार आणि बीए 5 ( BA 5) व्हेरिएंटचे तीन रूग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या व्हेरिएंटची लागण होणाऱ्यात दोन डोस घेतलेल्यांचाही समावेश आहे.

राज्यात आढळलेले बी ए. व्हेरिएंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्मे चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे.

3सर्व रुग्णांनी करोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील ९ वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही. सर्व रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना घरगुती विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची वाढती रुग्णसंख्या पाहता काही भागाची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. करोनाची ही वाढती रुग्णसंख्या विचार करायला लावणारी आहे, तेव्हा मास्कसक्ती नसली तरी सावधगिरी बाळगावीच लागेल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

- Advertisment -

ताज्या बातम्या