Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारिक्षा अपघातात सात प्रवासी जखमी

रिक्षा अपघातात सात प्रवासी जखमी

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) वाडीवऱ्हे -शिरसाठे रस्त्यावर आज सायंकाळी 5.00 वाजेच्या सुमारास रिक्षाचा अपघात झाला त्यात सात जण जखमी झाले. यात दोन बालकांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

रिक्षा क्रमांक MH.04.CW.9587 हे वाहन वाडीवऱ्हेकडुन शिरसाठे कडे जात असताना मोडाळे गावाजवळ सदर रिक्षास कुत्रा आडवा आल्याने रिक्षा पलटी झाली. त्यात प्रवास करणाऱ्या सात प्रवाशांना हाता पायास व डोक्यास गंभीर मार लागला असून यात दोन बालकांचा समावेश आहे.

चंद्रकांत प्रकाश गांगुर्डे वय( 35) श्रध्दा चंद्रकांत गांगुर्डे वय ( 27) श्रेया विलास गांगुर्डे वय( 11) मनिषा सुरेश दोंदे वय( 24) मालती सुरेश दोंदे वय ( 42 ), प्रतिक चंद्रकांत गांगुर्डे वय 3 वर्षे , भुषन काळु जाधव वय( 30) रा गंगापुर नासिक अशी जखमींची नावे आहेत.

जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकाचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड पाटील यांनी तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या