एकाच कुटूंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा

एकाच कुटूंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा

ओझे l वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) शिवार पाडा ( Shivarpada ) येथे एकाच कुटुंबातील 7 सदस्यांना जेवणातून विष बाधा झाली असून सर्वांना ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहे.

पश्चिम आदिवासी भागात असलेल्या शिवार पाडा येथे राउत कुटुंबियांच्या दुपारी जेवणात भाकर व इतर पदार्थ खाल्ल्यानंतर सात ही व्यक्तींना जुलाब,वांत्या, जळ जळ असा त्रास सुरू झाला.त्यानंतर त्यांना नानाशी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर डॉक्टर प्रशांत जोशी व इतरांनी उपचार केले.

सध्या सुनील देवराम राउत ,विठ्ठल राउत,राधा राउत,नंदा राउत,काशिनाथ राऊत,चंद्रकला राउत यांच्यावर उपचार सुरू आहे.त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठवण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष मांडगे यांनी ननाशी आरोग्य केंद्रात भेट देऊन रुग्णाची प्रकृतीची विचार पुस केली.

दिंडोरी नगर पंचायत नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांची माहिती घेतली व वरिष्ठांना कळवली.या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून रुग्णाच्या प्रकुर्तीत सुधारणा होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com