बिबट्याच्या कातडीची तस्करी; वनविभागाच्या सापळ्यात सात जणांना रंगेहाथ पकडले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बिबट्याच्या कातडीसह सात जणांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. घोटी-सिन्नर रस्त्यावर शहापूर वनविभागाने (Shahapur Forest dept) धडक कारवाई केली. याप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सर्व संशयित हे नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबक (Trimbakeshwar) तालुक्यातील तर एक संशयित जव्हार तालुक्यातील मोखाडा (Mokhada) येथील असल्याने खळबळ उडाली आहे….(seven arrested in leopardSkin smuggling at ghoti sinnar highway igatpuri)

अधिक माहिती अशी की, शहापूर वनविभागातील अधिकाऱ्यांना वाशाळा वनपरिक्षेत्र (Vashala forest range) परिसरात नाशिक जिल्ह्यातून काही संशयित बिबट्याच्या कातडीची विक्री (leopard skin smuggling) करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या टीप वरून १९ जानेवारीपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

या सापळ्यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी व वन्यप्राणी मित्र संतोष जगदाळे हे बनावट ग्राहक बनले होते. त्यांनी या संशयितांना संपर्क केला; यानंतर या संशयितांनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा इथून बदलून घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरविले. तसेच तेथे त्यांना या संशयितांनी बिबटयाच्या कातड्याची मोबाईलवर व्हिडिओ दाखवून त्याचा व्यवहार करावयाचे असल्याचे सांगण्यात आले. (video about leopard skin smuggling)

परंतु त्यादिवशी या संशयितांनी व्यवहार केला नाही. यानंतर पुन्हा या संशयितांनी बनावट ग्राहकाला मोबाईलवर कॉल करून बिबट्याच्या कातडीची विक्री करण्याचे ठरवले. दरम्यान, 02 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा एकदा व्यवहाराकरिता पहिल्यांदा घाटनदेवी मंदिर परिसरात बोलवले. यानंतर ठिकाण बदलून मौजे उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत ठिकाण ठरले. (Ubhade village near sinnar ghoti highway)

त्यानुसार शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले (RFO Vasant Ghule) यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा-विशाल गोदडे वनपरिक्षेत्र अधिकारी खर्डी- प्रशांत देशमुख व वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर- प्रकाश चौधरी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त सापळा रचला. यावेळी बिबट्याच्या कातड्याचा करताना या सातही संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या चार दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात आल्या.

याप्रकरणी संशयित 1) काळु सोमा भगत. वय 36 वर्षे रा. भावली ता. इगतपुरी जि. नाशिक. 2) रघुनाथ शंकर सातपुते वय 34 वर्ष.रा.मोखाडा ता. जव्हार.जि पालघर. 3) मुकुंदा सोमा सराई. वय 55 वर्ष. रा अस्वली हर्ष. ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक. 4) गोटीराम एकनाथ गवारी. वय 34 वर्षे रा. सामोडी ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक. 5) अशोक सोमा मेंगाळ वय 29 वर्ष. रा भावली ता. इगतपुरी. जि नाशिक. 6) योगेश लक्ष्मण अंदाडे. वय 26 वर्ष. रा. फागुळगव्हान.ता. इगतपुरी जि.नाशिक. 7) अर्जुन गोमा पानेडा. वय 28 वर्ष. रा. चाफयाचापाडा (शिरोळ). ता.शहापुर जि.ठाणे या संशयितांना ताब्यात घेतल्या आले आहे. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *