‘सेट’ ची अर्जप्रक्रिया सुरु

तीनशे गुणांसाठी हाेईल परीक्षा
‘सेट’ ची अर्जप्रक्रिया सुरु

नाशिक | प्रतिनिधी

सहाय्यक प्राध्यापकपदाकरीता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेच्‍या तारखेची घोषणा केली. त्‍यानुसार इच्‍छुक पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. २६ सप्‍टेंबरला महाराष्ट्र व गोवा राज्‍यात सेट परीक्षा घेण्याचे नियाेजन केले जात आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्‍यात सेट परीक्षेचे संयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे केले जात असते. २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्‍या तारखांची घोषणा विद्यापीठाने नुकतीच केली आहे. १० जूनपर्यंत इच्‍छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच निर्धारीत शुल्‍क ऑनलाइन स्‍वरूपातच भरायचा असून, त्‍यासाठीदेखील १० जूनपर्यंत अंतीम मुदत असणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍याने उमेदवारांना त्‍यांच्‍या अर्जात दुरूस्‍ती करण्याची संधी दिली जाणार आहे. ११ ते १९ जून या कालावधीत उमेदवारांना अर्जात दुरुस्‍ती करता येईल. १६ सप्‍टेंबरला परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध केले जाणार आहे. तर सध्याच्‍या वेळापत्रकानुसार २६ सप्‍टेंबरला ही परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाने केलेली आहे.

तीनशे गुणांसाठी परीक्षा

वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाचे प्रश्‍न सेट परीक्षेत विचारले जात असतात. या परीक्षेंतर्गत पेपर एक आणि पेपर दोन घेतला जातो. शंभर गुणांसाठी पेपर क्रमांक एकमध्ये पन्नास प्रश्‍न विचारले जातात. एक तासाचा कालावधी या पेपरसाठी असतो. तर पेपर क्रमांक दोन हा संबंधित विषयाचा असतो व त्‍यास दोनशे गुण असतात. पेपर दोनकरीता दोन तासांचा अवधी असतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com