अनिल देशमुखांना सत्र न्यायालयाचा दिलासा; देशभर फिरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची परवानगी

अनिल देशमुखांना सत्र न्यायालयाचा दिलासा; देशभर फिरण्यासाठी आणखी तीन महिन्यांची परवानगी

मुंबई | प्रतिनिधी |Mumbai

कथित १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीनावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court ) मोठा दिलासा दिला.विशेष न्यायाधीश राहुल रोकडे (Justice Rahul Rokde) यांनी देशमुख यांना मुंबईबाहेर नागपूर तसेच उर्वरित देशभरात फिरण्यासाठी यापूर्वी दिलेली सूट आणखी तीन महिन्यांसाठी कायम ठेवली आहे....

कथित १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात (Extortion Case) अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना मुंबई बाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. यापूर्वी न्यायालयाने (Court) देशमुख यांना पहिल्यांदा मुंबईबाहेर संपूर्ण महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत जाण्यास दिड महिन्याची मुभा दिली.

त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशभरात जाण्यासाठी परवानगी दिली होती. त्यात वाढ करून ती ०२ नोव्हेबर पर्यंत वाढविली होती. ही मुदत संपल्याने देशमुख यांनी अ‍ॅड. इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत नव्याने अर्ज दाखल दाखल करून मुदतवाढ मागितली होती. त्या अर्जावर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली.यापूर्वीही न्यायालयाने परवानगी दिली असल्याने ती ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कायम ठेवली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com