जिल्ह्यात आजपासून सेवा पंधरवडा

जिल्ह्यात आजपासून सेवा पंधरवडा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वसामान्य जनतेची कामे कालमर्यादेत होण्याच्या दृष्टिकोनातून आज (दि. 17) ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे, त्यासाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांच्याकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क (Maharashtra Public Service Rights) अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांविषयी प्रलंबित कामांचा कालमर्यादेत निपटारा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D)यांनी दिल्या.

यावेळी गंगाथरन म्हणाले, सेवा पंधरवड्यात सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणार्‍या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, उर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित सेवाविषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेतमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी व अंमलबजावणीकरिता सर्व संबधीत अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी.

सर्व संबंधित विभागाच्या जिल्हाप्रमुखांनी सेवा पंधरवड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करावे व या संबंधातील प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकार्‍यांकडून दैनंदिन आढावा घेण्यात यावा आणि क्षेत्रीय भेटी देण्यात याव्यात. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याविषयी जनतेमध्ये यथोचित माहिती प्रसारीत करण्यात यावी. सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी, आयोजित शिबिरे, त्यामधील नागरिक-प्रशासनाचा सहभाग या विषयी स्थानिक प्रसार माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी.

सेवा पंधरवडा समाप्तीनंतर 5 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व सक्षम प्राधिकारी यांच्याकडून 10 सप्टेबर, 2022 अखेर प्रलंबित संदर्भांपैकी निपटारा करण्यात आलेले संदर्भ व निपटारा न झालेल्या संदर्भांविषयी स्वयंस्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र घेण्यात यावे. प्रत्येक शासकीय विभागाने सेवा पंधरवडा कालावधीत केलेल्या कामकाजाविषयी प्रमाणपत्रासह प्रगती अहवाल 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होणार आहे.

- गंगाथरण डी., जिल्हाधिकारी

प्रलंबित फेरफार नोंदणी

नाशिक 1813

देवळा 270

सुरगाणा 84

बागलाण 653

त्र्यंबक 187

मालेगाव 1175

इगतपुरी 426

नांदगाव 518

सिन्नर 857

चांदवड 346

निफाड 808

दिंडोरी 620

येवला 507

पेठ 53

कळवण 204

एकूण 8,521

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com