Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा परिषदेत सेवा पंधरवड्यास प्रारंभ

जिल्हा परिषदेत सेवा पंधरवड्यास प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad Nashik )रावसाहेब थोरात सभागृहात आज (१७) रोजी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यास’ (Service fortnight)प्रारंभ करण्यात आला, या कालावधीत प्राप्त तक्रारींचा निपटारा व नागरी सेवेशी निगडित शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नागरिकांच्या तक्रारी सोडवणे हे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे कर्तव्य असून नागरिकांप्रती आपले उत्तरदायित्व आहे त्यामुळे जिल्हा परिषदेशी निगडित प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा या पंधरवड्यात करण्यात यावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( ZP CEO Leena Bansod ) यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने आठ दिव्यांग बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात युडीआयडी कार्डचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात ३२०१ दिव्यांग कार्ड प्राप्त झाले असून पंचायत समित्यांमार्फत या सर्व कार्डचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, इ.व.द. १चे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह दिव्यांग बांधव व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या