Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशसीरम राज्य सरकारला ४०० रुपयांत तर खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयात देणार लस

सीरम राज्य सरकारला ४०० रुपयांत तर खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयात देणार लस

नवी दिल्ली

कोरोनासाठी लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्यात आता १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. तसेच कंपनीकडून राज्य सरकार व खाजगी हॉस्पिटलला लस खरेदी करता येणार आहे. आता सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India (SII) )राज्य सरकार व खाजगी रुग्णालयास देण्यात येणाऱ्या लसीची किंमत जाहीर केली आहे.

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड (Covishield) या करोना लसीचे उत्पादन केले जात आहे. केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे लसीकरण राज्य सरकारने करायचे आहे. त्यासाठी कंपन्यांकडून ५० टक्के लसींचा साठा राज्य सरकारला घेता येणार आहे. उर्वरित ५० टक्के साठा केंद्र सरकार घेणार आहे.

सीरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्डचे दर आज जाहीर केले आहे. राज्य सरकारला सीरम इन्स्टिट्युट ४०० रुपयांना लस देणार आहे. तर खाजगी हॉस्पीटलला ६०० रुपयांमध्ये लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारला १५० रुपयांत लस दिली जात होती. त्या किंमतीत काहीच बदल केला नसल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटकडून देण्यात आली.

बालकांंसाठी करोना प्रतिबंधक लस ऑक्टोबरपर्यंत : सीरम

महिन्याला १०-११ कोटी डोसचं लक्ष्य!

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी बोलून दाखवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या