सीरमने राज्यासाठी लसीची किंमत घटवली पण…

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली

सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) (SII) )राज्य सरकार व खाजगी रुग्णालयास देण्यात येणारी लसीची किंमत जाहीर केली होती. केंद्राला १५० रुपयांत मिळणारी ही लस राज्याला मात्र ४०० रुपयांना दिली जाणार होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज या लशीची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारला ४०० रुपयांना मिळणारी ही लस ३०० रुपयांना देण्यात येणार आहे.

BREAKING : आरोग्यमंत्र्यांची घोषणा : राज्यात लॉकडाऊन वाढणार

पुण्यात असणारे सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्ड लशीची निर्मिती करत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लशीची किंमत वेगवेगळी ठरवली होती. मात्र, आता या लशीची किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. यामुळे राज्यांना ही लस ३०० रुपयांना मिळणार आहे. सीरम इंस्टीट्यूट सीईओ अदार पूनावाला यांनी टि्वट करुन ही माहिती दिली.

सीरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड (Covishield) या करोना लसीचे उत्पादन केले जात आहे. केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे लसीकरण राज्य सरकारने करायचे आहे. त्यासाठी कंपन्यांकडून ५० टक्के लसींचा साठा राज्य सरकारला घेता येणार आहे. उर्वरित ५० टक्के साठा केंद्र सरकार घेणार आहे.

सीरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्डचे दर आज जाहीर केले आहे. राज्य सरकारला सीरम इन्स्टिट्युट ४०० रुपयांना लस देणार आहे. तर खाजगी हॉस्पीटलला ६०० रुपयांमध्ये लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारला १५० रुपयांत लस दिली जात होती. त्या किंमतीत काहीच बदल केला नसल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटकडून देण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *