Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशसीरमला हवी Sputnik V लसींच्या उत्पादनाची परवानगी

सीरमला हवी Sputnik V लसींच्या उत्पादनाची परवानगी

नवी दिल्ली:

कोरोनावरील कोविशील्ड लसींचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसींच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. स्पुटनिक व्ही (Sputnik V) लशींच्या निर्मितीसाठी सीरमने औषध महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केला आहे.

- Advertisement -

मोठी बातमी : राज्याच्या बारावीच्या परीक्षेचा दोन दिवसांत निर्णय

पुण्यात मुख्यालय असलेली सीरम सध्याच्या घडीला कोविशील्ड लसींचं उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं यासाठीचं संशोधन केले आहे. निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देत असताना सीरमने आता स्पुटनिकच्या (Sputnik V) निर्मितीसाठीदेखील अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून करण्यात येत आहे. रशियाची लस ‘स्पुटनिक व्ही’ ही येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना उपलब्ध होणार आहे. अपोलो रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध होईल. डीसीजीआयने सीरमला स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास लसींचे उत्पादन अतिशय गतीमान होईल. जगातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी असा सीरमचा लौकिक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या