करोना : तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी सीरमला मंजुरी
मुख्य बातम्या

करोना : तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी सीरमला मंजुरी

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला मंजुरी दिली आहे.

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी)- कोविड-१९ या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी अनेक देशांमध्ये लस निर्माण करण्यासाठी संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यशस्वी झाल्या आहेत. लस अगोदर कोण निर्माण करणार यासाठीही कंपन्यांची चढाओढ सुरु आहे. अगोदर कोण लस बाजारात आणणार याबाबतही दावे केलं जात आहेत. पुण्यातील ‘सिरम इंस्टिट्यूट कंपनी’ ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला मंजुरी दिली आहे. डीजीसीआयचे संचालक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला मंजुरी दिला असल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू करण्याआधी संबंधित माहिती केंद्रीय औषधी नियंत्रण संस्थेकडे (CDSCO) कडे जमा करावी लागणार आहे. या माहितीचे मुल्यांकन (DSMB) च्या निरिक्षणाखाली करण्यात आलं आहे. या चाचणीत सामिल असलेल्या व्यक्तीला चार आठवड्यांच्या आत दोन डोस दिले जाणार आहेत. म्हणजेच पहिला डोस दिल्यानंतर 29 व्या दिवशी दुसरा डोस दिला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षिततेच्यादृष्टीने कोरोनाशी सामना करण्यासाठी लस किती प्रभावी ठरते हे पाहण्यात येईल.

कोविड -१९ वरील तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींवर सखोल चर्चा करण्यात आली. तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीपूर्वी सीरम कंपनीला सुरक्षा संबंधी डेटा सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे (सीडीएससीओ) द्यावा लागेल. याचे मूल्यांकन डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड (डीएसएमबी) करून करण्यात येतं, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांसोबत कोरोना लस तयार करण्याच्या कामात लागलेल्या सीरम इंस्टिट्यूटने एप्रिल महिन्यातच उघडपणे लस तयार करण्याचा दावा केला होता. आता कंपनीत प्रति मिनिट 500 डोस तयार होत आहेत. मात्र ही लस किती मोठ्या प्रमाणावर तयार होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीची आवश्यकता भासणार आहे. अशात पूनावाला भारत आणि इतर देश यांच्यात 50-50 पद्धतीनेही विभागणी करू शकतात.

एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या कोरोना लसीच्या चाचण्यांचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, एस्ट्राजेनेकाला ही लस तयार करण्यासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची साथ मिळाली आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे. ही कंपवी दरवर्षी 1.5 अब्ज लसींचे डोस तयार करते. यात, पोलिओपासून ते मीझल्सपर्यंतच्या लसींचा समावेश आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने याच भारतीय कंपनीला आपली कोरोना लस तयार करण्यासाठी निवडले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com