Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशेअर बाजारात उसळी; सेन्सेक्सने वळवल्या सर्वांच्याच नजरा

शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्सने वळवल्या सर्वांच्याच नजरा

नवी दिल्ली | New Delhi

उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यातील निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने पंजाब वगळता चारही राज्यांत आघाडी घेतली आहे…

- Advertisement -

पाचही राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे पडसाद आशियाई शेअर बाजारावर पडले आहेत. मुंबई शेअर बाजारात सेंसेक्सने 1552 अंकांची उसळी घेतली. (Election results)

56 हजार 200 च्या उसळीने सेंसेक्सने सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. तर, निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी पाहायला मिळाली. ज्यामुळं निफ्टीची सुरुवात 16हजार 757 वर सुरु झाला.

पाच राज्यांमधील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीला सुरुवात झालेली असतानाच भाजपच्या कलाने निकाल दिसू लागले. याचा फायदा शेअर बाजारात गुंतवणूकदारांना होत असल्याचे दिसून आले आहे.

शेअर बाजारात सध्या बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, रिअल इस्टेट, वीज अशा क्षेत्रातील शेअर तगडी कमाई करताना दिसत आहेत. स्मॉल आणि मिड कॅप शेअरमध्येची चांगली खरेदी दिसून येत आहे.

सेंसेक्सचे सर्व 30 स्टॉक सध्या हिरव्या निशाणावर ट्रेंड करत आहेत. तर, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 46 शेअर्स हिरव्या निशाण्यावर ट्रेंड करत आहेत. तर, 4 शेअर लाल निशाण्यावर असल्याचे बघायला मिळते आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक वाढविण्याचा चांगली संधी आज सकाळी सकाळी चालून आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या