Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याबूस्टरडोससाठी ज्येष्ठ आग्रही

बूस्टरडोससाठी ज्येष्ठ आग्रही

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

जिल्ह्यात प्रशासन( District Administration ) लसीकरण ( Vaccination )वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिमा राबवताना दिसत असले तरी आरोग्य व इतर फ्रंटलाईन कर्मचार्‍यांमध्ये बूस्टर डोस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

- Advertisement -

फ्रंटलाईन वर्करपेक्षा साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक ( Senior citizens ) बूस्टर डोससाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनातर्फे रोज प्रकाशित होणार्‍या लसीकरणाच्या अहवालात ही बाब निदर्शनास आलेली आहे.

यामध्ये आजपर्यंत सावधगिरीचा म्हणजेच बूस्टर डोससाठी आरोग्य व इतर शासकीय कर्मचारी यांची संख्या 44,224 तर साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची 47 हजार 81 इतकी संख्या आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचा बूस्टर पूर्ण झाल्याशिवाय इतर नागरिकांना बूस्टर डोस मिळणार नसल्याचेदेखील प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 16 जानेवारी 2021 पासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य व इतर शासकीय कर्मचारी अधिकारी म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्सला दिला जात होता. कालांतराने हा डोस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. 16 जानेवारी 2021 पासून आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 1 लाख 93 हजार 816 फ्रंट लाईन वर्कर्स यांनी पहिला डोस तर 1 लाख 78 हजार 805 फ्रंटलाईन वर्कर्स यांनी दुसरा डोस घेतला आहे.

तसेच बूस्टर डोससाठी 10 जानेवारी 2022 पासून सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला फक्त फ्रंटलाईन वर्कर्सला देण्यात येत असलेला हा डोस अवघ्या 44 हजार 224 वर्कर्सने घेतला आहे. या आकडेवारीमधून फ्रंटलाईन वर्कर्सची बूस्टर डोससाठी उदासीनता दिसून येत आहे. प्रशासनाने साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील बूस्टर डोसची सुरुवात केली आहे.

त्यात आतापर्यंत 47 हजार 81 ज्येष्ठांनी बूस्टर डोस घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी म्हणजेच 16 मार्चपासून जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटाला लसीकरणाची सुरुवात झाली आहे. आजपर्यंत एकूण 50 हजार 907 बालकांना डोस देण्यात आलेला असून ही टक्केवारी 22 च्या आसपास आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी बैठक घेत लसीकरण कार्यक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या होत्या. यासाठी सुट्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश (Collector’s orders)

लसीकरण मोहीम जोरात राबवण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.(Collector Gangatharan D.) यांनी लेखी आदेश काढले असल्याचे समजते. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, अधीक्षक, तहसीलदार, मुख्याध्यापक आणि शिक्षक या सर्वांना मोहीम राबवण्याबाबत सांगितले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या