काँग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

काँग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

काँग्रेसचे जेष्ठनेते जयप्रकाश छाजेड ( Jayaprakash Chhajed)यांचे दिनांक १० रोजी रात्री निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते . ते निष्टावंत काँग्रेसवादी होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. इंटक या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष तर राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. आ‍ॅ‍ॅल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. नाशिकच्या राजकीय व सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.

छाजेड यांचे काही नातेवाईक लांबून येणार असल्याने त्यांचा अंत्यविधी दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी काँग्रेस भवन येथे ठेवण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com