सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले भाजप नेते किरीट सोमय्यांना चॅलेज

टेंडर घोटाळ्याला ईडी लावून दाखवावी!
सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले भाजप नेते किरीट सोमय्यांना चॅलेज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) हे माझे भाऊ आहेत. त्यांची ईडीशी (ED) चांगली सलगी आहे. त्यांना माझी विनंती आहे की, जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात ( Corona period) झालेल्या टेंडर घोटाळयाची (Tender Scam) चौकशी (inquiry) लावावी व पाचोर्‍यात (Pachora Municipality) सात ते आठ नगरपालिकेच्या जागांवर आरक्षण (lifting reservation on seats) उठवून त्या जागांची विल्हेवाट लावली जात असून यात नगररचना विभागाच्या (Town Planning Department) कायद्याचे पालन झालेले नाही. हा सुमारे 207 कोटींचा जागा आरक्षणाचा घोळ (Confusion of seat reservation) असून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ईडीची चौकशी (Investigation by ED) लावावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपूरे आदी उपस्थित होते.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्हा दौर्‍यावर असून धरणगाव, पारोळा, पाचोरा या तीन तालुक्यात सभा झाल्या असून जळगावातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, जनतेसमोर भाजपाचा कुटील डाव उघड करण्यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात आली आहे.

राज्यात ज्या पध्दतीने सुडाचे राजकारण केले जात आहे, ते आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असून भाजपात प्रवेश केला म्हणजे समोरच्या नेत्याला सेट करण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपाचा सुरु आहे आणि भाजपाच्या विरोधात जो जाईल त्याला शुट केले जात आहे.

परंतु, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भाजपातील एकाचा तरी भ्रष्टाचार उघड करावा, असे आव्हान त्यांनी केले. राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असून विरोधकांना अडकविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करीत आम्हाला जनतेसमोर हे प्रकर्षाने मांडावे लागणार असून कुठेतरी जनतेने भाजपाचा हा कुटील डाव हाणून पाडावा, असे आवाहनही अंधारे यांनी केले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव महापालिकेचा निधी थांबविला असून हे राजकारण करणे बरे नव्हे. शिवसेनेचा महापौर शिंदे गटात गेले नाही म्हणून जळगावच्या जनतेला वेठीस धरु नका. तात्काळ विकासाचा निधी वितरीत करा, असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com