Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याउद्योजकांच्या पुढाकाराने आत्मनिर्भर भारत शक्य

उद्योजकांच्या पुढाकाराने आत्मनिर्भर भारत शक्य

सातपूर । प्रतिनिधी

केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना राबवण्यासाठी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यांची माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी या उपक्रमात उद्योजकांनी पुढाकार घेतला तरच तो पूर्ण होणे शक्य आहे. इम्पोर्ट कमी करण्यासाठी सरकार व उद्योजक यांना मिळून काम करावे लागेल. तरच अर्थव्यवस्था सुदृढ होण्यास मदत होईल. भारतीय मूळ मालक व संपूर्ण स्वदेशी कच्चा माल वापरून उत्पादन बनवणारे उद्योग मोठे व्हावे, हा उद्देश या संकल्पनेमुळे साध्य होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय एमएसएमई बोर्डाचे सदस्य व भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशप्रमुख प्रदीप पेशकार यांनी केले.

- Advertisement -

लघुउद्योग भारती नाशिकतर्फे पेशकार यांचे आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना पेशकार यांनी विविध शासकीय योजना, सबसिडी, कर्ज पुरवठा, उद्योग संधी याविषयी माहिती दिली.

उद्योजकाने मी काय करू शकतो व काय संधी आहेत याचा विचार करून सुरुवात केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न लवकर साकार होईल. केंद्राने वित्तपुरवठा कसा सुलभ होईल याकडेही लक्ष दिले आहे. राज्य तसेच केंद्र सरकारला काही विकायचे असेल तर जीएमई पोर्टल तयार केले आहे. तिथे नोंदणी फक्त भारतीय मूळ असलेला करू शकतो. यासह फूड प्रोसेस, शेती पूरक व्यवसाय, डिफेन्स अशा अनेक उद्योग संधीची माहिती दिली.

या कार्यक्रमास नाशिक तसेच महाराष्ट्रातून अनेक उद्योजक उपस्थित होते. प्रास्ताविक लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, सूत्रसंचालन धनलक्ष्मी पटवर्धन व आभार मिलिंद देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमास संजय महाजन, योगेश बहाळकर, अजय लगड, प्रशांत कुलकर्णी, सुनील जोंधळे, विनोद पाटील, अविनाश मराठे यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या