Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.संजीव सोनवणे यांची निवड

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.संजीव सोनवणे यांची निवड

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ.संजीव अर्जुनराव सोनवणे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. पुढील पाच वर्षांसाठी ते कुलगुरुपदी कार्यरत राहतील. या नियुक्तीमुळे डॉ. सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू ठरले आहेत.

- Advertisement -

डॉ. संजीव सोनवणे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खादगाव येथील आहेत. सुरवातीला चंद्रशेखर आगाशे बीएड महाविद्यालयात १९८७ मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून डिसेंबर २००५ पासून सेवेला सुरुवात केली. त्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत विभागप्रमुख, अधिष्ठाता, सिनेट सदस्या, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्र-कुलगुरु अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या