
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Jalgaon Agricultural Produce Market Committee) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सभापती निवडीपूर्वी कोणताही राजकीय धोका नको, म्हणून महाविकास आघाडीचे 10 संचालक सहलीवर रवाना झालेले असून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जळगावात दाखल होणार आहे. त्यानंतर पॅनलप्रमुख गुलाबराव देवकर (Panel Chief Gulabrao Deokar) यांच्या उपस्थितीत सर्व संचालकांची बैठक (Directors meeting) होऊन सभापती निवडीवर शिक्का मोर्तब (Seal on election of Speaker) होणार आहे. यात डॉ.सुनील महाजन, लक्ष्मण पाटील, शामकांत सोनवणे यांची सभापती पदासाठी दावेदारी असली तरी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक 11 जागा मिळविल्या. तर भाजप-शिंदे गट युतीला सहा जागा मिळविण्यात यश आले. महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र, जळगाव जिल्हा बँकेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जळगाव बाजार समितीचे 11 संचालक सभापती निवडीपूर्वीच सहलीवर रवाना झालेले आहेत.
दोन दिवसांची धार्मिक स्थळांची वारी करुन सर्व संचालक शनिवारी जळगावात दाखल होणार आहे. त्यानंतर पॅनलप्रमुख गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत सर्व संचालकांची बैठक होऊन सभापती-उपसभापती निवडीवर चर्चा होऊन दोन संचालकांच्या नावावर एकमत करण्यात येईल. त्यानंतर त्या दोन संचालकांना मतदान करण्याचा व्हीप बजावण्यात येणार आहे. तसेच सभापती-उपसभापती निवडीचा कार्यक्रम दि. 20 मे रोजी दुपारी 12 वाजता कृउबा समितीच्या सभागृहात होणार असल्याने या निवडणुकीच्या अर्धा तास अगोदर सभागृहात नवनिर्वाचित संचालकांचे आगमन होणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी 12 निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
सन 2023- 2028 या कालावधीसाठी जळगाव कृषी बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड दि. 20 मे रोजी दुपारी 12 वाजता जळगाव कृउबा समिती सभागृहात होणार आहे. जळगाव बाजार समिती सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी के.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. दि.20 रोजी दुपारी 12.15 ते 12.25वाजता सभापती-उपसभापती पदासाठी दाखल अजार्र् छाननी, दुपारी 12.25 ते 12.30 वाजता माघार घेणे व निवडणूक लढविणार्या उमेदवारांची नावे जाहीर करणे, दुपारी 12.45वाजता उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करणे, दुपारी 1 ते 1.30वाजता मतदान होईल. त्यानंतर मतमोजणी होऊन सभापती-उपसभापती पदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात!
जळगाव कृउबा समिती सभापती निवडणूक कार्यक्रम काही क्षणावर येऊन ठेपलेला आहे. सभापतीपदासाठी सुनील महाजन, लक्ष्यमण पाटील, शामकांत सोनवणे या तिघांमध्ये रस्सीखेच सुरु असून सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी उत्सुकता शिगेला पोेहोचली आहे.