'या' विभागातील थकबाकीदारांना जप्ती वॉरंट; पंधरा दिवसात कोट्यावधींची करवसुली

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | Nashik

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) व कर उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली (tax) मोहिम तीव्र करण्यात आली असून, एकट्या नाशिकरोड (Nashik Road) विभागातील 49 थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आल्यानंतर  गेल्या पंधरा दिवसात 1.67 कोटींची थकबाकी वसुल करण्यात यश आले आहे.

सध्या महापालिकेच्या सहाही विभागात कर वसुली मोहिम राबविली जात आहे. नाशिकरोड विभागीय कार्यालयाने गेल्या पंधरा दिवसात घरपट्टीच्या थकबाकीपोटी 89 लाख 1 हजार 634 रुपये तर पाणीपट्टीचे 77  लाख 69 हजार 434 रुपये वसुल केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिकरोड विभागीय अधिकारी (Divisional Officer) जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. या विभागात 7,468 थकबाकीदारांना अंतिम सूचनापत्र बजावण्यात आले, त्यापैकी 49 थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहेत.

नाशिक मनपा
'त्या' लुट प्रकरणातील संशयितांना अवघ्या चार तासांत मुद्देमालासह अटक

घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकांनी आणि आस्थापनांनी चालू वर्षाचा आणि मागील वर्षांचा थकीत कर त्वरीत भरावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com