Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखैराच्या लाकडांसह वाहन जप्त; दोन जण ताब्यात

खैराच्या लाकडांसह वाहन जप्त; दोन जण ताब्यात

पेठ | प्रतिनिधी peth

पेठ येथील वनपथकाला (Department of Forest, Peth )मिळालेल्या गुप्त माहीतीचे आधारे मुख्य वन संरक्षक नितीन गुदगे , उप वन संरक्षक पंकज गर्ग , वनधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सिमारेषेवरील चेक पोस्टवर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण सोनवणे व त्यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली.

- Advertisement -

पेठ – धरमपूर- नाशिक मार्गावर महाराष्ट्र – गुजरातच्या सीमेवर गुजरातकडून महाराष्ट्रात प्रवेश करणारे संशयित वाहन क्रमांक MH 04 FP 5759 याची तपासणी करते वेळी त्यात खैर प्रजातीचे ६१३ नग ८. १७८ घनमीटर लाकूड हे कुठलेही परवाना नसलेला मुद्देमाल व ८ लाखाचे वाहन एकुण सुमारे १२ लाखाचा मुद्देमाल पकडण्यात आला. दरम्यान आरोपी रमेश गुप्ता व मोहम्मद इमरान सिद्दीकी यांनाही यावेळी ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या