
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
अजमेर येथून ट्रॅव्हल्स बस मधून मालेगावी आणला जात असलेला तलवार , गुप्ती , कुकरी व रेम्बो चाकू अशा प्राणघातक शस्त्रांचा (deadly weapons )साठा शहरात दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मालदे शिवारात सापळा लावून जप्त केला, याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून ही शस्त्रे त्याने कशासाठी व कोणास विक्रीसाठी आणली होती याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली
अजमेर येथून मालेगाव येथे प्राणघातक शस्त्र आणली जात असल्याची माहिती पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली होती सदर माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक टेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी उपनिरीक्षक राऊत वाघमोडे यांच्यासह पोलिस पथक घेत मुंबई आग्रा महामार्गावर दुपारच्या सुमारास सापळा लावला होता.
अजमेर येथून नाशिक कडे जाणारी ट्रॅव्हल्स बस मालदे शिवारात येताच पोलिसांनी ती थांबूवन तपासणी केली असता एका बॅगेत आठ तलवारी, आठ गुफ्ती, दहा चाकु व पाच कुकरी अशी शस्त्र मिळून आल्याने ती पोलिसांनी जप्त करीत ही शस्त्रे आणणाऱ्या परवेज आलम जमालुद्दीन वय एकोणावीस राहणार रसूलपुरा मालेगाव यास ताब्यात घेतले पवारवाडी पोलीस ठाण्यात (Pawarwadi Police Station )याप्रकरणी परवेज आलम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.