गावठी कट्ट्यासह हत्यारे हस्तगत

दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
गावठी कट्ट्यासह हत्यारे हस्तगत

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने एका हद्दपार सराईताकडून गावठी कट्ट्यासह तलवारी सारखे हत्यारे जप्त करण्याची कारवाई केली आहे.

यावर सविस्तर वृत्त असे की पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या दरोडा व शस्त्र विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित अक्षय गणपत गावंजे (२४, रा. सावता नगर नवीन नाशिक )याच्याकडे धारदार हत्यारे आहेत.

यावरून उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळ, पोलीस अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी, महेश खांडबहाले, संदीप डावरे, मोहन देशमुख, महिला पोलिस अंमलदार मनीषा सौरभ कांबळे व मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील हवालदार रोहिदास सोनार, समीर शेख यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता एक गावठी देशी बनावटीचे पिस्तोल, तीन जिवंत काडतुस, एक तलवार व एक कोयता त्याच्याकडे असल्याचे निदर्शनास आल्यावरून संशयिता विरोधात अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com