Photo वैशाख वणवा...पावसाळी वातावरण... अन् गुलमोहरामुळे बहरले रस्त्यांचे सौंदर्य

Photo वैशाख वणवा...पावसाळी वातावरण...
अन् गुलमोहरामुळे बहरले रस्त्यांचे सौंदर्य

छायाचित्रे : सतीश देवगिरे

नाशिक

गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. उन्हाळ्यात गुलमोहरासारखे भरभरून फुलणारे दुसरे झाड नाही. गुलमोहराचे सौंदर्य पाहावे ते उन्हाळ्यातच. कारण हा देखणा वृक्ष उन्हाळ्यातच फुलतो.

रणरणत्या उन्हात त्याच्या डेरेदार फुलण्याकडे आपण बघतच राहतो. नाशिकमधील आडगाव नाक्याजवळील विजयनगर कॉलनीतील रस्त्यांचे सौंदर्य गुलमोहरांच्या झाडावरुन पडलेल्या पाकळ्यांमुळे खुलले आहे.

जणू कोणाच्या स्वागतासाठीच रस्त्ये फुलांनी सजवण्यात आले आहे. मे महिन्यातील रणरणते उन्हाएेवजी पावसाळी वातावरण झाल्याने गुलमोहराच्या पाकळ्या गळून पडल्या.

गुलमोहोरास वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल-केशरी पाकळ्या असतात. त्यात पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात. अन त्यामुळे या फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते. गुलमोहराच्या फुलाचे वैशिष्ट्य आहे की त्यातील एक इतर पाकळ्यांहून निराळी असलेली पाकळी....जी रंगाने मुख्यत्वे पिवळी असते आणि त्यावर लाल नाजूक रेषा असतात. गुलमोहर उन्हाळ्यात फुलतो तसा पावसाच्या सरींनी ओथंबून ढळतो. पावसाच्या सरींना लपेटून त्याच्या पाकळ्या हळूहळू गळू लागतात.

Photo वैशाख वणवा...पावसाळी वातावरण...
अन् गुलमोहरामुळे बहरले रस्त्यांचे सौंदर्य
या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com