अडीच वर्षीय आराध्याची स्मरणशक्ती पाहून थक्क व्हाल !

अडीच वर्षीय आराध्याची स्मरणशक्ती पाहून थक्क व्हाल !

नाशिक

नाशिकमधील (nashik) अडीच वर्षीय आराध्या जयराम गावित (Aradhya Gavit) या चिमुकलीची स्मरणशक्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. आराध्याने आपल्या सामान्य ज्ञानामुळे अनेकांना अचिंबत केले. देशातील २८ राज्य व ९ केंद्रशासीत प्रदेशाच्या राजधान्या ती एका सेंकदात सांगते. केवळ ४३ सेंकदात सर्व राजधान्या सांगण्याचा तिने विक्रम केला. या विक्रमाची नोंद ३६० बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. याबद्दल तिचे पालकमंत्री छगन भुजबळांकडून (Chhagan Bhujbal) कौतूक केले गेले.

अडीच वर्षीय आराध्याची स्मरणशक्ती पाहून थक्क व्हाल !
झायडस कॅडिला लसीसाठी नाशिकमधील चार लाख मुले पात्र

खेळण्याबाळगण्याच्या वयात आराध्य आपल्या तोतऱ्या बोलाने सर्वांना आश्चर्यचकीत करत आहे. देशातील सर्व राज्यांच्या राजधान्या ती काही सेंकदात सांगते. त्यानंतर अनेक प्रकारच्या सामान्य ज्ञाने ती सर्व अचिंबत करते. कोणती फळे कोणत्या जिल्ह्यात होते?महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर? शिवाजी महाराजांचे आईचे नावे, सर्वात लांब नदी, देशातील पहिली महिला शिक्षिका, आदिवासी दिन, आदिवासी जिल्हा, आदिवासी वाद्य, असे अनेक प्रश्नांची उत्तरे ती देते. राज्यातील अनेक मंत्र्यांची नावेही ती सांगते.

भुजबळांनी केले कौतूक

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आराध्या गावितचे कौतुक केले. यावेळी जयराम गावित, अनिता गावित, राहुल बनसोडे, संजय वाघ, रामेश्वर साबळे, अक्षय गांधी, सुयोग वाघ, उमेश भोये, अमोल शिरसाठ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com